शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2026: गुढी कशी उभारावी आणि कधी उतरवावी? शुभ मुहूर्त, पूजा विधीसह शास्त्रोक्त माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:07 IST

How to Make Gudi on Gudi Padwa 2026: १९ मार्च रोजी गुढीपाडवा आहे, मात्र त्याच दिवशी अमावस्या संपत असल्याने गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी जाणून घ्या. 

मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा. यावर्षी तिथींच्या क्षयामुळे तारखेबाबत आणि वेळेबाबत संभ्रम असू शकतो, परंतु शास्त्रानुसार १९ मार्च २०२६ हाच दिवस नूतन वर्षारंभासाठी निश्चित करण्यात आला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Gudi Padwa 2026: नववर्षाच्या स्वागताला दारी रेखाटा स्वस्तिक आणि आकर्षित करा अनंत ऐश्वर्य!

गुढीपाडवा नक्की कधी आणि मुहूर्त काय?

यावर्षी १८ मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती १९ मार्चला सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी होत आहे. त्यानंतरच चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होईल आणि त्याबरोबरच चैत्र नवरात्र तथा श्रीराम नवरात्र सुरु होईल. 

गुढी उभारण्याची शुभ वेळ: सकाळी ६:५३ नंतर कधीही.

पंचांग आणि गणपती पूजन: सकाळी ६:५३ नंतरच करावे.

विशेष टीप: अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होत असल्याने, सर्व धार्मिक विधी ६:५३ नंतर करणे शास्त्रोक्त ठरेल.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठी नववर्षाचा पहिला दिवस.

गुढी उभारण्याची शास्त्रोक्त पद्धत (Gudi Kashi Ubharavi)

गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हटले जाते. तिची उभारणी करताना खालील गोष्टींचे पालन करावे:

स्वच्छता व स्नान: पहाटे उठून घर स्वच्छ करावे आणि अभ्यंगस्नान करावे.

तोरण व रांगोळी: मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. अंगणात सुंदर रांगोळी काढावी.

गुढीची तयारी: वेळूची (बांबूची) काठी धुवून स्वच्छ करावी. त्याच्या टोकाला भरजरी वस्त्र, गाठी (साखरेची माळ), कडुनिंबाची डहाळी आणि फुलांची माळ बांधावी.

कलश: काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या (गडू/लोटी) पालथा घालावा.

उभारणी: सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत ही गुढी उंच ठिकाणी उभारावी.

Gudi Padwa 2026: अनेक प्रयत्न करूनही घरात पाळणा हलत नसेल, तर गुढीपाडव्यापासून करा 'हे' व्रत!

कडुलिंबाचा प्रसाद: आरोग्याची गुरुकिल्ली

गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पाने, मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ आणि हिंग यांचे मिश्रण एकत्र करून त्याचा प्रसाद सर्वांना द्यावा.

महत्त्व: हा प्रसाद शरीर तेजस्वी आणि निरोगी बनवतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी हे 'अमृत' मानले जाते.

पंचांग वाचन आणि राम नवरात्र

पंचांग पूजन: नवीन पंचांगाची पूजा करून त्यातील 'वर्षफल' (वर्षभराचे भविष्य) सर्वांनी मिळून वाचावे.

राम नवरात्र: याच दिवसापासून श्रीराम नवरात्र व वासंतिक नवरात्र सुरू होते. यंदा मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरातील रामरायाची पूजा करून रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे.

Palmistry: अचानक धनलाभाची संधी कशी मिळते, हे तुमची हस्तरेषा सांगते; कसे ते पहा 

गुढी कधी उतरवावी?

दिवसभर आनंदाने सण साजरा केल्यानंतर, सूर्यास्तापूर्वी गुढीला हळद-कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करावा आणि गुढी सन्मानाने उतरवावी.

महत्त्वाचे: 

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ, खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Gudi Padwa 2026: Auspicious timings, rituals, and significance explained.

Web Summary : Gudi Padwa 2026 falls on March 19th. The auspicious time to raise the Gudi is after 6:53 AM. The article details the rituals, significance of neem leaves, and the tradition of Panchang reading. It also explains when to lower the Gudi, emphasizing the day's auspiciousness for new beginnings.
टॅग्स :Gudi Padwaगुढीपाडवा 2026gudhi padwaगुढीपाडवाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीfoodअन्नNew Yearनववर्ष 2026