शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2024: वसूबारसेला करा कामधेनु मूर्तीची पुजा; लक्ष्मी, कुबेराची वास्तुवर सदैव राहील कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 15:08 IST

Diwali 2024: २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे, त्या मुहूर्तावर छोटी का होईना कामधेनुची मूर्ति घरी आणा आणि तिची नियमित पूजा करा.

पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसेच घरात सकारात्मकता राहते. म्हणून वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धरला आहे. त्यातही शुक्रवारी अर्थात लक्ष्मी मातेच्या प्रिय वारी कामधेनू घरी आणल्यास अधिक लाभ होतो असे वास्तूशास्त्रज्ञ सांगतात. २८ ऑक्टोबर रोजी दिवाळी (Diwali 2024) सुरू होत असून त्या दिवशी रमा एकादशी (Rama Ekadashi 2024) आणि वसुबारस (Vasu Baras 2024) आहे, त्यानिमित्ताने कामधेनूची पुजा आवर्जून करा. ही  संगमरवरी मूर्ती दिसायला मोहक, आकर्षक आणि वात्सल्यपूर्ण असते. फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊ. 

गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते. शहरात तसे करणे शक्य नाही. त्यावर उपाय आहे मूर्ती किंवा प्रतिमेचा! वास्तु तज्ज्ञांच्या मते, कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात. असे मानले जाते की ज्या घरात कामधेनू गाईचे वासराचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरलेले राहते. वासरासह कामधेनू गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो.

- घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम (नैऋत्य) दिशेला लावा. लवकरच फायदा होईल.

- घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदी राहते. 

- वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात लक्ष्मी वास करू लागते. 

- उत्तर-पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. 

- घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते.

- पश्चिम कोनात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते. व्यक्तीचे उत्पन्न वाढते. आध्यात्मिक वातावरण तयार होते. 

- घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील तर कामधेनू गाईचे चित्र ईशान्य कोपर्‍यात लावावे आणि नंतर नियमित प्रार्थना करावी.

- घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता कायम ठेवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र लावावे.

- त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. लवकरच फायदा होईल.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीVastu shastraवास्तुशास्त्र