शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

'तुझं कमळ,तर माझं घड्याळ'; भाजपाच्या धस यांना आव्हान देत राष्ट्रवादीकडून आजबेंचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:13 IST

मला पैसे खाण्यासाठी आमदारकी नको. मला या संधीच सोनं करायचे आहे: बाळासाहेब आजबे

- नितीन कांबळेकडा (बीड) : गेल्या पाच वर्षांत आपण मतदार संघात साडेतीन हजार कोटींचे विकास कामे आणली. पण हे विकासकामे यांना दिसतील कधी, तुम्ही कमळाचे चिन्ह आणले पण हा बाळासाहेब आजबे पण राजकारणात लेचापेचा नाही. या निवडणुकीत होऊन जाऊदे, तुझे कमळ तर माझे घड्याळ, असे जाहिर आव्हान विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी भाजपाचे सुरेश धस यांना सभेतून दिले. आमदार आजबे यांनी घड्याळाचा एबी फॉर्म मिळाल्याचे सांगत धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गेवराईच्या बदल्यात आष्टीची जागा भाजपने घेतली. याठिकाणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना डावलून सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, आज इच्छुक आमदार आजबे यांनी देखील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये सर्व आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ. बाळासाहेब आजबे बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे, शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब लटपटे,धैर्यशिल थोरवे, नवनाथ सानप,विठ्ठल नागरगोजे,पोपट शेंडे, विश्वास नागरगोजे,दिपक घुमरे, हारिभाऊ दहातोंडे, महादेव डोके, नामदेव शेळके आदींची उपस्थिती होती. 

पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले, मला पैसे खाण्यासाठी आमदारकी नको. मला या संधीच सोनं करायचे आहे. तालुक्यात पाणी आणायचे आहे. ते फक्त देखावा करीत आहेत. मागील पंधरा वर्षं त्यांनी काय केले. या भाजपा उमेदवाराने फक्त विकास कामे आडविण्याचे काम केले, असा आमदार तुम्हाला पाहिजे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर मी खोडावर घाव घालीन असा इशाराही आजबे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकashti-acआष्टीSuresh Dhasसुरेश धस