शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पगाराच्या हिशोबाचा तगादा लावला, वनरक्षक पतीने जीवनच संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:06 IST

लग्नानंतर काही दिवसांमध्येच पती – पत्नीत सातत्याने वाद होऊ लागले

ठळक मुद्दे पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखलआष्टी तालुक्यातील घटना

आष्टी : लग्न होण्याच्या आधीच्या पगाराचा हिशोब द्या, असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई – वडिलांना पैसे दिल्यामुळे मारहाण करून शेती नावावर करण्यास पत्नीचा शारीरिक आणि मानसिक त्रास पतीस असहाय्य झाला होता. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली . याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पत्नीसह चौघांवर शनिवारी (१९ जून ) आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

अनिल आबासाहेब जगताप ( रा . टाकळसींग , ता . आष्टी ) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीनुसार, अनिल यांचा विवाह २०१४ साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता . अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर कासार येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती – पत्नीत सातत्याने वाद होऊ लागला . लग्ना अगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोब ती मागू लागली . तसेच तुमच्या आई – वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले. दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर आई – वडिलांना घरासमोर फरशी करण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता . याबाबत अश्विनीच्या आई – वडिलांना कळवले असता त्यांनी मुलीचीच बाजू लावून धरली . तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले.

आष्टीत स्थायिक होताच अश्विनीने जमीन नावावर करून दे असा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यावर्षी मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली . अनिलने वारंवार फोन करूनही तिने परत येण्यास नकार दिला . जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने अनिलला बजावले. अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने २८ मे रोजी दुपारी शृंगेरी देवी समोरुन जाणाऱ्या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना २९ मे रोजी उघडकीस आली . दरम्यान सदर फिर्यादिवरून अजिनाथ देवराव भवर , विजुबाई अजिनाथ भवर , अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवार दि.१९ जून रोजी अनिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सलिम चाऊस हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड