शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे उल्लंघन; एक कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

बीड : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. मार्च ...

बीड : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. मार्च ते मेअखेरपर्यंत जवळपास ५० हजार कारवाया वाहतूक शाखेकडून करण्यात आल्या असून, जवळपास एक कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमुळे कोरोना संसर्ग थांबविण्यासदेखील प्रशासनास काही प्रमाणात यश आले आहे. यामध्ये नगरपालिकेसोबत मिळून विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली होती.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. जिल्ह्यातील रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक होती. अनेक निर्बंध घालण्यात आले होते. विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे ‌आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अनेकजण विनाकारण गाडी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. यावेळी केलेल्या कारवायांमुळे आवश्यक नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या निश्चित कमी झाली होती. मात्र, दुचाकीस्वारांना पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्यामुळे अनेक ठिकाणावरून तीव्र संतापदेखील पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध पाहायला मिळाला होता.

या अडीच महिन्यात ट्रिपल सिट, विनामास्क, नो पार्किंग, विनापरवाना यासह विविध कारणास्तव जवळपास ५० हजार केसेस करण्यात आल्या. यावेळी नियम मोडणाऱ्यांकडून एक कोटी पाच लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अजूनदेखील कारवाया सुरूच असून, किमान दुचाकीस्वारांची परिस्थिती पाहून किंवा सर्वांगीण विचार करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अनेकवेळा फक्त ग्रामीण भागातील वाहनचालकांवर कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

मोबाइलवर बोलणे - १३००

ट्रिपल सिट ११००

विनाहेल्मेट १२००

नो पार्किंग १७००

नंबर प्लेटसंदर्भात कारवाई ९००

विनापरवाना वाहन चालवणे ९००

नो पार्किंग, मोबाइल बोलणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया

एप्रिल व मे महिन्यात नो पार्किंमध्ये वाहन उभे करणे व मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील दंडात्मक कारवाई केल्यामुळे अनेकजण मास्क वापरू लागले आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार केसेस

मोटार वाहन कायद्यानुसार सर्वाधिक ५० हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व माध्यमातून जवळपास एक कोटी पाच लक्ष रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. या कारवायांमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे पोलीस प्रशासनाचे मत आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यामुळे अपघात टाळता येतात. त्यामुळे सर्व नियमांचे पालन व्हावे, यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात आल्या. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील कारवाई केल्यामुळे अनेकजण मास्क वापरत आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यात मदत होत आहे.

कैलास भारती, वाहतूक शाखाप्रमुख, बीड

===Photopath===

220621\22_2_bed_2_22062021_14.jpg

===Caption===

वाहतूक शाखा