कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST2021-07-29T04:32:53+5:302021-07-29T04:32:53+5:30

कडा (जि. बीड) : आष्टीकडून कामानिमित्त जामखेडला जाणाऱ्या दुचाकीला नगरकडे जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील ...

Two on a two-wheeler were killed in a car crash | कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

कडा (जि. बीड) : आष्टीकडून कामानिमित्त जामखेडला जाणाऱ्या दुचाकीला नगरकडे जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला.

आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील बाळासाहेब भाऊसाहेब सुरनर (वय ३५) व बबन किसन चव्हाण (वय ४५) (दोघे रा. कवडगाव, ता. जामखेड) हे दोघे मंगळवारी आष्टीकडून दुचाकीने (क्र. एमएच २३, झेड ५८९) जामखेडच्या दिशेने जात होते. दरम्यान , जामखेड येथून नगरकडे भरधाव जाणाऱ्या कारने ( क्र. एम. एच. २३, इडी ३५६२) मंगळवारी दुपारी बीड-नगर रोडवर दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात बाळासाहेब सुरनर व बबन चव्हाण हे दोघेही जागीच ठार झाले. धडक देणारा कार चालक पसार असून, आष्टी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस नाईक रघुनाथ आटोळे करीत आहेत.

280721\20210728_122425_14.jpg

Web Title: Two on a two-wheeler were killed in a car crash