शिरूर कासार (जि. बीड) : शेतात काम सुरू असताना सावलीसाठी उभारलेल्या मंडपात विद्युतप्रवाह उतरून विजेच्या धक्क्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना शिरूरजवळील काटेवस्तीवर बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. रेणुका किरण काटे (३०, रा. काटेवस्ती) असे मृत महिलेचे नाव आहे. अन्य तीन जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
शिरूरजवळील काटे वस्तीवरील शेतात रब्बी हंगामातील कांद्याची कापणी सुरू होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतात सावलीचा मंडप उभारण्यात आला होता. मात्र, मंडपावरून विद्युतवाहिनी गेल्याने मंडपात विद्युतप्रवाह उतरला. मंडपाच्या लोखंडी अँगलला स्पर्श झाल्याने रेणुका किरण काटे यांचा जागीच मृत्यू झाला; तर त्यांच्यासमवेत असलेल्या सुनीता काटे, प्रियंका काटे व आनंद काटे (रा. काटेवस्ती, ता. शिरूर कासार) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शिरूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
महिलेवर सायंकाळी अंत्यसंस्कार
रेणुका किरण काटे या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरूर कासार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन डिडूळ हे पुढील तपास करीत आहेत.
Web Summary : A woman died and three others were injured by electrocution in Shirur Kasar, Beed, after a farm tent used for shade became electrified. The incident occurred when an overhead power line caused electricity to flow through the tent's metal frame during onion harvesting.
Web Summary : बीड के शिरूर कासार में खेत में बने मंडप में करंट लगने से एक महिला की मौत हो गई और तीन अन्य घायल हो गए। यह घटना तब हुई जब छाया के लिए इस्तेमाल किए जा रहे मंडप से बिजली का प्रवाह हुआ, जिससे प्याज की कटाई के दौरान धातु का फ्रेम विद्युतीकृत हो गया।