शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या मोंढ्यात बेशिस्तीमुळे व्यापारी त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST

परळी : येथील मोंढा मार्केट भागात शिस्तीचा अभाव असून, फळ, भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याने गर्दी होत आहे. ...

परळी : येथील मोंढा मार्केट भागात शिस्तीचा अभाव असून, फळ, भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याने गर्दी होत आहे. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शहरातील नागरिक व मोंढ्यातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. पर्यायी व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास आठ मार्चपासून व्यापार बंदचा इशारा येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे. याप्रश्नी शुक्रवारी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद, परळी शहर ठाण्यात निवेदन दिले आहे.

शहरातील मोंढ्यातील हनुमान मंदिराच्या समोर व पूर्व बाजूस अनधिकृतपणे फळविक्रेते सार्वजनिक रस्त्यावर गाडे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. या ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. परळी शहर पोलिसांतर्फे अनेक वेळा रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या फळ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली; परंतु रस्त्यावर गाडे लावून भाजी, फळे व अन्य वस्तूंची विक्री करीत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गर्दी होत आहे. या गर्दीतून इतर वाहनेही चालवणे अशक्य झाले आहे. याप्रश्‍नी आठ मार्च रोजी व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून निषेध करणार आहेत. यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर सिद्धार्थ जैन, आशिष भंडारी यांच्यासह इतर व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

===Photopath===

050321\img-20210305-wa0488_14.jpg