परळीत मध्यरात्री अज्ञातांचा धुडगूस; रस्त्यावर उभ्या ९ चारचाकी फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 19:43 IST2024-06-05T19:42:35+5:302024-06-05T19:43:10+5:30

मंगळवारी रात्री पाऊस पडल्यानंतर वीज गेली, याचा फायदा घेत अज्ञातांनी घातला धुडगूस

The tumult of the unknown; 9 four-wheelers standing on the road were smashed | परळीत मध्यरात्री अज्ञातांचा धुडगूस; रस्त्यावर उभ्या ९ चारचाकी फोडल्या

परळीत मध्यरात्री अज्ञातांचा धुडगूस; रस्त्यावर उभ्या ९ चारचाकी फोडल्या

परळी (बीड): शहरातील गणेशपार रोड, श्री संत सावतामाळीनगर, कृष्णा नगर भागात घरा समोरील रस्त्यावर लावलेल्या ९ चारचाकी वाहनांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना चार जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. 

याबाबतची माहिती अशी की, शहरात मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पाऊस झाला. यावेळी वीज गेल्याने रस्त्यावर अंधार होता. या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गणेशपार रोडवर लावण्यात आलेली कार, ऑटो रिक्षा या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच संत सावता माळीनगर, कृष्णा नगर भागात देखील  धुडगूस घालत कारची तोडफोड केली. याप्रकरणी बुधवारी परळी शहर पोलीस ठाण्यात व संभाजीनगर पोलीस ठाण्यात कारचालक सतीश सानप, प्रकाश वर्मा ,नवनाथ चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सपोनी शिंदे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.

नवीनच कारची केली तोडफोड
मी तीन दिवसापूर्वीच नवीन कार खरेदी केली. गणेशपार रोडवरील घरासमोर लावली होती. रात्री अंधारात अज्ञात व्यक्तीने कारची तोडफोड केली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
- नवनाथ चव्हाण, कारचालक

Web Title: The tumult of the unknown; 9 four-wheelers standing on the road were smashed