श्वानांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:26+5:302021-07-24T04:20:26+5:30

दलालांचा सुळसुळाट अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, ...

Take care of the dogs | श्वानांचा बंदोबस्त करा

श्वानांचा बंदोबस्त करा

दलालांचा सुळसुळाट

अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.

अवैध धंद्यांना ऊत

पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

गतिरोधक उभारावेत

बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा या सपाट झालेल्या गतिरोधकामुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करीत आहेत.

वाहतुकीची कोंडी

गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: Take care of the dogs