‘स्वाराती’च्या पोलीस चौकीला वाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:36 IST2021-08-27T04:36:25+5:302021-08-27T04:36:25+5:30

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पोलीस चौकीतील अंमलदार रामलिंग अभंग यांची नुकतीच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बदली ...

Swarati's police station has no guardian | ‘स्वाराती’च्या पोलीस चौकीला वाली नाही

‘स्वाराती’च्या पोलीस चौकीला वाली नाही

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पोलीस चौकीतील अंमलदार रामलिंग अभंग यांची नुकतीच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बदली झाली आहे. त्यामुळे या चौकीला कोणीच वाली नसल्याने दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे.

स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची रोज प्रचंड गर्दी होत आहे. त्यात न्याय वैद्यकीय प्रकरणांचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी स्वाराती परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली. मागील सहा वर्षांपासून पोलीस हेडकाँस्टेबल अभंग हे येथे चौकी अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत होते. मयतांचे शवविच्छेदन, एमएलसीमधील जवाब अशी जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. मागील १५ दिवसांपूर्वी त्यांची येथून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बदली करण्यात आली. त्यानंतर पुरेशा स्टाफअभावी या चौकीचे अंमलदारपद रिक्त आहे. तिथे कोणीही नसते. त्यामुळे ऐनवेळी कोणाशी संपर्क करावा, याबाबत रुग्ण आणि नातेवाईकांत संभ्रम निर्माण होत आहे. पोलिसांसंबंधी प्रक्रिया आटोपण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे अभंग यांची येथे पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी डॉक्टर आणि नागरिकांनी केली आहे.

Web Title: Swarati's police station has no guardian