शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई; १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:30 IST

नदीपात्रात वाळू भरताना आढळलेल्या वाहनांपैकी एक वाहन पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांत होती.

ठळक मुद्देपुरुषोत्तमपुरीत ३ टिप्पर, एक जेसीबीसह १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्तवाळूची चोरी महसूल-पोलीस यांच्या संगनमताने होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.

माजलगाव (जि. बीड) : मंगळवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पुरुषोत्तमपुरी येथील नदीपात्रात धाड टाकून अवैधरीत्या वाळू भरणारे ३ टिप्पर व १ जेसीबीसह १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या हायवापैकी एक हायवा पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची चर्चा आहे.

तालुक्यात २४ गावे वाळूसाठा उपलब्ध असलेली आहेत. मात्र, लिलावापेक्षा वाळूच्या चोरट्या तस्करीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना जास्त पैसा मिळत आहे. तालुक्यातील ३ वाळूघाटांचा लिलाव होऊनही ते सुरूच नसल्याने माफियांकडून गंगामसला, बोरगाव, पुरुषोत्तमपुरी, आबेगाव, रिधोरी, गव्हाणथडी यासह अनेक ठिकाणांहून वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. मात्र, स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्याकडून कुठलीही कारवाई न करता अभय देण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी हॅलो बीड आवृत्तीमध्ये ‘वाळूच्या चोरट्या धंद्याने डोके काढले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास हजारे यांच्या टीमने मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पुरुषोत्तमपुरीत थेट गोदापात्रात कारवाई केली. तेथे वाळू उपसा करीत असलेले जेसीबी, वाळूसह तीन टिप्पर, असा १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टिप्परवर नंबरदेखील खोडलेले आहेत. याप्रकरणी आरोपी शेख बशीर शेख चांद व इतर तीन यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे आली कारवाईची वेळतालुक्यात वाळूची चोरी महसूल-पोलीस यांच्या संगनमताने होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या पथकाला कारवाई करण्याची वेळ आली. मंगळवारी नदीपात्रात वाळू भरताना आढळलेल्या वाहनांपैकी एक वाहन पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांत होती. मागील महिन्यात खुद्द उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीकांत गायकवाड यांनाच वाळूसाठी ६५ हजारांची लाच घेताना पकडले होते.

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड