शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट रस्ता काम रोखण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : बांधकाम विभागाच्या अभियंत्याशिवाय शहरापासून आयटीआय काॅलेजपर्यंत सुरू असलेल्या डांबरी रस्त्याच्या नूतनीकरण कामात अत्यल्प डांबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : बांधकाम विभागाच्या अभियंत्याशिवाय शहरापासून आयटीआय काॅलेजपर्यंत सुरू असलेल्या डांबरी रस्त्याच्या नूतनीकरण कामात अत्यल्प डांबर वापरून निकृष्टपणे सुरू असलेले काम परिसरातील नागरिकांनी शनिवारी रोखून रस्त्यावरच ठिय्या मांडला.

आष्टी शहरापासून शिंदेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची गेल्या पाच वर्षांपासून प्रचंड दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयटीआय काॅलेजपर्यंत डांबरीकरणाचे काम गेल्या तीन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. या डांबरीकरण व मजबुतीकरण कामासाठी नियमानुसार खोदकाम करून मुरूम पसरवणे, पाणी मारून दबई करणे व नंतर खडी पसरविल्यानंतर दबई झाल्यानंतर डांबराच्या सहाय्याने मजबुतीकरण, डांबरीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने पूर्वीच्याच खड्डेमय रस्त्यावर खडी अंथरली असून, त्यामध्ये अत्यल्प डांबर वापरून थातुरमातूर पद्धतीने काम सुरू केले आहे. परिसरातील संजय नगर, लक्ष्मी नगर व सुंदर नगर भागातील रहिवाशांच्या ही बाब लक्षात येताच सर्वांनी मिळून शनिवारी सकाळी हे काम बंद पाडले.

दरम्यान, या कामावर बांधकाम विभागाचे अभियंता अथवा कंत्राटदाराचा मुकादमही हजर नव्हता. केवळ मजुरांकरवी सुरू असलेले हे निकृष्ट काम परिसरातील अनिल कांबळे, अण्णा विटकर, विशाल रंधवे, रणजित गुप्ता, विनोद गायकवाड, अण्णा साठे, सागर कांबळे, नितीन वाघमारे, महेंद्र वाघमारे, अजित राऊत, राजेंद्र राऊत, फेरोज आतार, किरण नन्नवरे, शाम वाल्हेकर, सिद्धांत योगे, संदीप शिरोळे, प्रदीप सुर्वेकर, रामदास जाधव, बाळू चव्हाण, अकील कुरेशी आदींनी रस्त्यावर ठिय्या मांडून थांबवले. अभियंता कामावर आल्याशिवाय व दर्जा राखल्याशिवाय हे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला आहे.

काम नेमक्या कोणत्या विभागाचे?

रस्त्याचे हाती घेण्यात आलेले हे काम कोणत्या विभागाकडून सुरू आहे, याचा थांगपत्ता लागेनासा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल जोरवेकर यांच्याशी संपर्क केला असता, संबंधित काम हे प्रधानमंत्री ग्रामसडक विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले. या विभागाचे अभियंता दिलीप पालवे यांनीही शहरानजिक असलेली कामे आमची नसतात, असे सांगितले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता तळेकर यांनीही हे काम आमच्याकडे नाही, असे सांगितल्याने हे काम नेमके कोणत्या विभागाकडे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आष्टी ते आयटीआय काॅलेज रस्ता कामात डांबराचा अत्यल्प वापर केला जात असल्याने परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.

===Photopath===

280221\28bed_9_28022021_14.jpg