शैक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी कुलगुरूंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:05+5:302021-06-24T04:23:05+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कुलगुरूंकडे मागणी अंबाजोगाई : कोरोना परिस्थितीमुळे सध्या शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाट शैक्षणिक शुल्क ...

Statement to the Vice-Chancellor for reduction of tuition fees | शैक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी कुलगुरूंना निवेदन

शैक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी कुलगुरूंना निवेदन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कुलगुरूंकडे मागणी

अंबाजोगाई : कोरोना परिस्थितीमुळे सध्या शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाट शैक्षणिक शुल्क देण्यास पालक सक्षम नसल्याने हे शुल्क कमी करावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने कुलगुरू व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात विद्यापीठ निकालाच्या सर्व त्रुटी लवकरात लवकरात दुरुस्त कराव्यात, ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असताना शुल्क हे ऑफलाईनपद्धतीप्रमाणे आकारले जात आहे. तसेच शुल्कात प्रोजेक्ट शुल्कही मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कात कपात करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली नाही त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भातील सूचना संबंधित शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांना द्याव्यात, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जागेवरील प्रवेश फेरी (स्पॉट राऊंड) मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार नाही असा शासन निर्णय आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून त्या सर्व विद्यार्थ्यांनादेखील शिष्यवृत्ती योजना लागू करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Statement to the Vice-Chancellor for reduction of tuition fees