शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:32 IST

बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना टोला लगावला.

Pankaja Mundhe On Beed Railway: गेल्या ४० वर्षांपासून रखडलेले बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न आज अखेर पूर्ण झालं.  बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचं आज लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या विकासकामांवरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार बजरंग सोनवणे यांना टोला लगावला. बजरंग सोनवणे तुम्ही भाग्यवान आहात असं म्हणत पंकजा मुंडे यांनी चिमटा काढला.

अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवेला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वे सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी नेत्यांनी भाषणं केली. मंत्री पंकजा मुंडे यांनीही भाषण करताना सर्वांचे आभार मानले. यासह लोकसभा निवडणूक पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्याबाबतही भाष्य केलं.

"मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं की, एकवेळ माझं नाव घेतलं नाही तरी चालेल. पण आमच्या प्रीतम ताईंचे नाव याच्यामध्ये आवर्जून घ्या. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. बजरंग बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कुणी, पेरलं कुणी आणि कापणीच्या वेळी बाप्पा आले. पण मला आनंद आहे की तुम्ही रेल्वेच्या विकासासाठी आणखी प्रयत्न करत आहात. त्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही," असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

अजितदादा तुम्ही बीडमध्ये या - पंकजा मुंडे

"दादांच्या कामाचा सपाटा सर्वांनाच माहिती आहे. त्यांची पद्धतही माहिती आहे. दादा तुम्ही बीड जिल्ह्यात दर आठवड्याला या, सर्वांना सकाळी लवकर उठायची सवय लागेल. दादा तुमच्याप्रमाणे मी देखील थोडं थोडं केलं. मी पण आज सकाळी ७ वाजता पूरग्रस्तांसाठी दौरा केला. जर आपण असेच पुढे गेलो तर या जिल्ह्याच्या विकासाला कुठेही गालबोट लागणार नाही," असे पंकजा मुडें म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेbajrang sonwaneबजरंग सोनवणेBeedबीड