केज : पोटात दुखू लागल्याने आणि अतिरक्तस्राव होत असल्याने सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका अल्पवयीन विवाहितेच्या उपचारादरम्यान बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात कागदपत्रे तपासली असता पीडितेचे वय उघड झाले आणि तेथूनच कायद्याचा बडगा उगारला गेला. या प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबांतील पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवून तो केज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी १० वीत शिकत असतानाच, दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह केज तालुक्यातील एका गावात लावून देण्यात आला होता. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही दोन्ही कुटुंबांनी हा विवाह लावून दिला होता.
...असा उघड झाला प्रकारकाही दिवसांपूर्वी पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला सुरुवातीला स्थानिक ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर धाराशिव येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने तिला सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा ६ महिन्यांचा गर्भपात झाला. रुग्णालयाने वयाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली असता, ती अल्पवयीन असल्याचे समोर आले. सोलापूर पोलिसांनी तत्काळ पीडितेचा जबाब नोंदवून ‘झीरो’ने गुन्हा दाखल केला आणि तो पुढील कारवाईसाठी केज पोलिसांकडे वर्ग केला.
पतीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हाअल्पवयीन असतानाही विवाह करणे आणि पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल पतीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या विवाहासाठी जबाबदार असलेले आई-वडील, सासू-सासरे आणि इतर नातेवाइकांवरही बालविवाहास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
Web Summary : Minor girl's abortion reveals child marriage. Authorities filed a 'POCSO' case against her husband and family in connection with the illegal marriage. The girl was married two years ago, while still a student. The investigation continues.
Web Summary : नाबालिग लड़की के गर्भपात से बाल विवाह का खुलासा। अधिकारियों ने अवैध विवाह के संबंध में उसके पति और परिवार के खिलाफ 'पॉक्सो' मामला दर्ज किया। लड़की की शादी दो साल पहले, अभी भी एक छात्रा होने के दौरान हुई थी। जांच जारी है।