योगेश्वरी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:36 IST2021-08-27T04:36:31+5:302021-08-27T04:36:31+5:30

याप्रसंगी सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन परीक्षेला सुवर्णपदक विजेता शिवम सिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत निखिल हाके ...

Pride of students in Yogeshwari Vidyalaya | योगेश्वरी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव

योगेश्वरी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव

याप्रसंगी सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन परीक्षेला सुवर्णपदक विजेता शिवम सिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत निखिल हाके (गुणवत्ता यादीत), अभिजित सोनटक्के, क्षितीज देशमुख, पीयूष काकडे, रोहित केंद्रे, सर्वेश कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात आला. मार्गदर्शिका शिल्पा थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.

आर्थिक मागास प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ता यादीतील आदित्य मुडेगावकर, अनुप शेळवणे, असित जगताप, अथर्व नरारे, कैवल्य मोटेगावकर, पांडुरंग कांबळे, प्रणव मोरे, प्रणव सूर्यवंशी, प्रणित जगताप, समर्थ देवगावकर, शिवम गर्जे, सुशांत ढाकणे, यश कोपले, यश माने, यशवंत गंगणे यांचाही सत्कार करण्यात आला . पर्यवेक्षक विलास गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक रवींद्र मठपती यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत मसने यांनी केले. पर्यवेक्षिका ए. आर. पाठक यांनी सर्वांचे आभार मानले. कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला .

Web Title: Pride of students in Yogeshwari Vidyalaya