नेहरुंचा समाजवाद वास्तववादी

By Admin | Updated: February 19, 2015 00:45 IST2015-02-19T00:28:37+5:302015-02-19T00:45:29+5:30

अभय टिळक : विद्यापीठातील राष्ट्रीय परिसंवादास प्रारंभ

Nehru's socialism is realistic | नेहरुंचा समाजवाद वास्तववादी

नेहरुंचा समाजवाद वास्तववादी


बीड : जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी अग्नीतांडव पहावयास मिळाले. धारूर तालुक्यात तीन तर आष्टी तालुक्यात एक घर खाक झाले. दुसरीकडे परळीत तीस एकर ऊसाचा अक्षरश: कोळसा झाला.
धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील साठे वस्तीवर दुपारी दोन वाजता एका घराने पेट घेतला. त्यानंतर लगतची दोन घरेही आगीने कवेत घेतली. भगवान तोंडे, धनराज साठे, योगीराज तोंडे यांची घरे जळून खाक झाली. संसारोपयोगी साहित्यासह धान्य, रोख रक्कम असा दोन लाख रूपयांचा ऐवज आगीत भस्मसात झाला. धारूर पालिकेचा अग्नीशमन बंब पाचारण केला. त्यानंतर आग आटोक्यात आली. तलाठी अनिल जोशी यांनी पंचनामा केला. आगीचे कारण गुलदस्त्यात असून घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.
पोखरीतही आग
आष्टी तालुक्यातील पोखरी येथील बाबासाहेब नारायण नवगरे यांच्या घरावरून गेलेल्या वीजतारेमध्ये शॉर्टसर्कीट झाले. ठिणग्या झाडावर पडल्याने घराने पेट घेतला. यामध्ये पाच लाखांचा ऐवज जळाला. मंडळ अधिकारी एस. एम. बडे, तलाठी एन. एस. चव्हाण यांनी पंचनामा केला आहे. (विविध वार्ताहरांकडून)
दौनापूर (ता. परळी) येथे रमेश आघाव, सूर्यकांत आघाव, चंद्रकांत आघाव, अनिरूध्द आघाव, वाल्मिक आघाव, शंकर हंगे, संतराम हंगे, हरिश्चंद्र लोणकर, बळीराम भारती, महादेव भारती, भास्कर लोणकर यांच्या ऊसाला आग लागली.
४२० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पालिकेचा बंब पाचारण केला होता. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

Web Title: Nehru's socialism is realistic