आष्टी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:44+5:302021-03-08T04:30:44+5:30

आष्टी : आष्टी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, क. स्तर, येथे तालुका विधी सेवा समिती व वकील ...

National People's Court in Ashti Court | आष्टी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत

आष्टी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत

आष्टी : आष्टी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, क. स्तर, येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल २१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन अध्यक्ष तालुका विधी समिती, आष्टी, तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, के.के. माने यांनी केले आहे.

पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी येणाऱ्या लोक अदालतीत ठेवावीत. सदरच्या लोक अदालतमध्ये दाखल पूर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवाणी दावे, फौजदारी खटले, बँकांची कर्ज प्रकरणे, दूरध्वनी देयकाची अशी विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन न्या. के.के. माने यांनी केले आहे.

Web Title: National People's Court in Ashti Court