शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:52 IST

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांचा समावेश आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुन रचण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, खुणे यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या, यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."

अमोल खुणे यांच्या पत्नी म्हणाल्या,एक महिन्यापासून माझ्या पतीला दारु पाजत होते. त्या नशेमध्ये त्यांच्याकडून हे सगळे करून घेतले जात होते. मात्र माझे पती मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये व स्टेटसला नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते जरांगे पाटलांना देव मानतात. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी खुणे यांच्या आईनेही प्रतिक्रिया दिली. त्यांनी माझ्या  मुलाचा प्रकरणात काहीही संबंध नसल्याचा दावा केला. यावेळी खुणे यांच्या आईला आणि पत्नीला अश्रू अनावर झाले.  दरम्यान, प्रकरणाने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोन जणांनी जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याची तक्रार जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी केली होती. या तक्रारीवरुन ही कारवाई केली. धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

 "माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाहीये. त्याने जी घटना करायला नको होती, ती त्याने केली आहे. हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली आहे. राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही", असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. मी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही प्रत्युत्तर जरांगेंनी मुंडेंना दिले आहे. 

मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची अडीच कोटी रुपयांमध्ये सुपारी दिली, असे जरांगे म्हणाले. त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला. तो धनंजय मुंडेंचा पीए असल्याचेही जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. "मला माहिती मिळाली होती. ती मी पोलिसांना दिली. घातपाताच्या प्रकरणात आठ ते दहा जण आहेत. त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्या प्रकरणाची चौकशी व्हायला नको का?", असे जरांगे म्हणाले. 

"धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायची म्हणत असतील, तर मी नार्को टेस्ट करून घ्यायला तयार आहे. उद्या मी गृह मंत्रालयात, न्यायालयात, पोलीस अधीक्षक कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार. धन्या मी तुझ्यासारखा नाहीये. मी जातवाण आहे. मी असे खुनाचे, घातपाताचे आरोप करू शकत नाही. नार्को टेस्टला सगळ्यात आधी जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो?, अशी टीका जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Conspiracy against Jarange: Husband drugged, says wife of accused.

Web Summary : Amol Khune's family alleges he was drugged and used in a plot against Maratha leader Manoj Jarange Patil. Jarange Patil accuses Dhananjay Munde of plotting his murder. Police are investigating the claims, and Jarange has offered to undergo a narco test.
टॅग्स :BeedबीडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे