शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 19:49 IST

अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील घटना; मृतदेह डोंगरपिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारून चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत आढळून आला.

अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे ३५ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सचिन शिवाजी तिडके (वय ३५, रा. भोगलवाडी, हल्ली मुक्काम डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी व डोंगरपिंपळा गावचे जावई आहेत. मागील एक वर्षापासून ते सासुरवाडी डोंगरपिंपळा येथे पत्नी व मुलांसोबत राहत होते. मंगळवारी रात्रीपासून सचिन तिडके हे बेपत्ता होते. बुधवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह डोंगरपिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारून चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक घुगे व पोलिस कॉन्स्टेबल भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन यांचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, सदरील खून हा सासुरवाडीतील लोकांनीच घडवून आणला असल्याचे सचिन यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. कारण, ते मृतदेहाजवळ गेले असता सासुरवाडीकडील लोकांनी मयताच्या नातेवाइकांना शिवीगाळ व अंगावर दगड घेऊन धावले असल्याचे सांगत आहेत. सचिन यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आईवडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड