शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोगची पुनरावृत्ती! प्रेमसंबंधाच्या संशयावरून दोन दिवस डांबून झोडपले, युवकाचा मृत्यू;  १० जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 06:23 IST

मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.   

कडा (जि. बीड) : आपल्या मुलीसोबत प्रेमसंंबंध असल्याच्या संशयावरून ट्रकचालक तरुणास पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. आष्टी पोलिस ठाण्यात दहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.   

विकास अण्णा बनसोडे (२३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे  तीन वर्षांपासून विकास ट्रकचालक होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. विकास हा पिंपरी गावात मित्रासह दोन दिवसांपूर्वी आला होता. याचदरम्यान विकास व भाऊसाहेब यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून दोरी व वायरच्या साहाय्याने विकासला बेदम मारहाण केली. त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ आकाश अण्णा बनसोडे याच्या फिर्यादीवरून दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

आरोपींचे पलायन  मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे कळताच दोघाजणांनी चारचाकी वाहनातून मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवला आणि निघून गेले. कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवायचा प्रयत्न केला; पण वाहनचालक न थांबता निघून गेला.

तीन आरोपींना अटकगुन्हा दाखल होताच पोलिसांनी भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विकासच्या फोनवरून आई, वडिलांना फोनमुलाला दोन दिवस बेदम मारहाण करत असताना मृताच्या फोनवरून त्याच्या आई-वडिलांना फोन करून लवकर या इथं, आल्यानंतर सांगतो काय झालं ते, असे मोबाइलवरून संभाषण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपींमध्ये दहा जणांचा समावेश भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर (रा. पिंपरी घुमरी), संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू