केज: शहरातील राष्ट्रीय महामार्ग आणि शासकीय जमिनीवर असलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी प्रशासनाने जोरदार कारवाई केली. प्रशासनाने दिलेल्या नोटिशीची मुदत संपल्यानंतर, बुधवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईची चाहूल लागताच, अनेक टपरीधारकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी मध्यरात्रीच दुकाने आणि डबे काढून घेतले होते.
प्रशासकीय फौजफाटा आणि बंदोबस्त
या मोहिमेत तहसीलदार अशोक भंडारी, उपविभागीय अधिकारी शुभम पवार, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या आदेशानुसार, दंगल नियंत्रण पथकाचे २ प्लाटून आणि चार पोलीस ठाण्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेकनूरमध्ये शुक्रवारी कारवाई
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस केज शहर आणि अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर कारवाई चालेल. त्यानंतर शुक्रवारी नेकनूर आणि परिसरातील महामार्गावरील अतिक्रमण काढले जाणार आहे.
Web Summary : Kej city witnessed a major encroachment removal drive on Wednesday targeting national highway and government land. The administration, along with heavy police security, demolished illegal structures after the notice period expired. Similar action is planned for Neknoor area on Friday, officials said.
Web Summary : केज शहर में बुधवार को राष्ट्रीय राजमार्ग और सरकारी भूमि पर अतिक्रमण हटाने का बड़ा अभियान चलाया गया। प्रशासन ने भारी पुलिस सुरक्षा के साथ नोटिस अवधि समाप्त होने के बाद अवैध निर्माणों को ध्वस्त कर दिया। अधिकारियों ने कहा कि शुक्रवार को नेकनूर इलाके में भी इसी तरह की कार्रवाई की योजना है।