शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडला पोटदुखीचा त्रास; तपासणीत 'सिस्टायटिस'चे निदान, काय आहे 'हा' आजार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:22 IST

बदललेलं रूप अन् अनवाणी पाय! तगड्या बंदोबस्तात तपासणी करून पुन्हा कारागृहात रवानगी

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोटदुखी आणि तापाचा त्रास होत असल्याने जिल्हा कारागृहातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याला येथे आणण्यात आले. मात्र, तपासणीनंतर प्रकृती धोक्यात नसल्याचे स्पष्ट झाल्याने औषधोपचार देऊन त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

वाल्मीक कराड याला ११ आणि १५ एप्रिल रोजी कारागृहातच प्राथमिक उपचार देण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. सर्जन आणि फिजिशियन यांनी तपासणी केल्यानंतर त्याचे सीटीस्कॅन, सोनोग्राफी आणि रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. सोनोग्राफी आणि सीटीस्कॅनमध्ये 'सिस्टायटिस' (मूत्राशयातील बदल) जाणवले, तर रक्ताच्या अहवालातही काही किरकोळ बदल दिसून आले. हे सर्व आजार औषधांनी बरे होण्यासारखे असल्याने डॉक्टरांनी त्याला ॲडमिट न करता पुन्हा कारागृहात पाठवले.

बदलेले रूप अन् कडक बंदोबस्तरुग्णालयात आणले तेव्हा वाल्मीक कराडच्या रूपात मोठा बदल जाणवला. वाढलेले आणि पूर्ण पांढरे झालेले केस, हातात बांधलेले भगवे दोरे-गंडे आणि पायात चप्पल नसलेल्या अवस्थेत तो दिसला. रुग्णालयातील तपासण्यांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. उपचार आणि तपासण्या पूर्ण होईपर्यंत जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा राबता होता.

'सिस्टायटिस' म्हणजे काय?सिस्टायटिस म्हणजे मूत्राशयाची सूज. हे सहसा जिवाणू संसर्गामुळे होते. मूत्राशयाच्या अस्तराला सूज आल्याने लघवी करताना जळजळ आणि वेदना होतात. वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहोचू शकतो.

प्रमुख लक्षणे काय?१. लघवी करताना तीव्र जळजळ किंवा वेदना होणे.२. वारंवार लघवीला जावे लागणे; पण प्रमाण कमी असणे.३. लघवीचा रंग गढूळ होणे किंवा दुर्गंधी येणे.४. ओटीपोटात सतत दुखणे किंवा ताण जाणवणे.

'सिस्टायटिस'चे निदानतपासण्या केल्या असता 'सिस्टायटिस' असल्याचे निदान झाले; परंतु औषधोपचारावर हा आजार बरा होणार असल्याने ॲडमिट केले नाही.-डॉ. नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Valmik Karad's Abdominal Pain: Cystitis Diagnosis; Understanding the Disease

Web Summary : Accused Valmik Karad, experiencing abdominal pain, was diagnosed with cystitis after tests. Doctors prescribed medication, preventing hospital admission. His changed appearance and tight security were noted.
टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या