शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

Lok Sabha Election 2019 : सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर बीड पोलिसांकडून कारवायांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:38 PM

अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून आणखी ५० च्यावर लोकांची यादी तयार केली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांत वाद झाला होता. या घटनेत अनेकांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्या. तसेच शुक्रवारी केज तालुक्यातील धर्माळा येथे लोकसभा निवडणुक उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याची खोटी अफवा पसरवली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सोशल मिडीयावरून टिका व अपशब्द वापरून खालच्या स्तराचे राजकारण झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये विशेष विभाग स्थापन केला. ७०३०००८१०० या क्रमांकावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यासंदर्भात आवाहन केले. नाव गोपनिय ठेवण्याचा विश्वास दिला. त्यामुळे अवघ्या १२ तासांत तक्रारींचा ढिगारा साचला. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक रोशन पंडित स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी आलेल्या तक्रारींची शहानिशा केली. पोस्ट टाकणाऱ्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळविले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. 

पत्ता आणि संपर्क करताना दमछाकसोशल मिडीयावर पोस्ट टाकल्याचे दिसून येते. मात्र संबंधिताचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. विशेष टिम यासाठी काम करू लागली आहे. संपर्क करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

खोट्या बातम्या छापणाऱ्यांवरही नजरधर्माळा येथील घटनेत उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याच्या बातम्या अनेकांनी प्रसिद्ध केल्या. मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असून यात कसलेही राजकीय कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. अनेक माध्यमांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे वृत्त प्रकाशित केले. त्यांनाही पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटीस पाठविली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते.

प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे सोशल मिडीयावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या पोस्टची खात्री करून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांनी आणि माध्यमांनी खोट्या बातम्या व अफवा पसरवू नयेत. बीड पोलिसांना सहकार्य करावे.- विजय कबाडे, अपर  पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडSocial Mediaसोशल मीडिया