कडा (ता. आष्टी): आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतातील सर्व्हे नंबर १५३ मध्ये एका १० ते १२ वर्षे वयोगटातील बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. २९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हा बिबट्या गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील पशुधनावर हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये त्याची मोठी दहशत होती.
मृत्यूचे गूढ कायमवनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्याचा मृत्यू साधारण ६ ते ८ दिवसांपूर्वी झाला असावा. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मृतदेह पूर्णपणे कुजला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, बिबट्याचे शरीर अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन (Post-mortem) करता आले नाही. लॅबमध्ये तपासणीसाठी कोणताही अवयव घेता न आल्याने मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
वनविभागाची कारवाईबिबट्याचे दात, नखे आणि इतर सर्व अवयव सुरक्षित असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वृद्धत्व किंवा उष्मघातामुळे हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पंचनामा केल्यानंतर रात्रीच्या सुमारास वनविभागाच्या आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अवयव सुरक्षित होते"बिबट्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. त्याचा मृत्यू वृद्धत्वामुळे झाला की उन्हामुळे, हे नेमके सांगता येणार नाही. बिबट्याचे नखे, दात आणि सर्व अवयव जागेवर सुरक्षित होते."—अमोल मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी.
कारण अस्पष्ट''मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने शवविच्छेदन करता आले नाही. मृत्यूचे कारण सांगता येणार नाही.''-डॉ.संतोष धोंडे, पशुवैद्यकीय अधिकारी
Web Summary : A leopard, known for preying on livestock in Limbodi, was found dead in a sugarcane field. The cause of death is unknown due to decomposition, preventing a post-mortem examination. Officials suspect old age or heatstroke, but definitive reasons remain unclear. All body parts were found secure.
Web Summary : लिंबोडी में पशुधन का शिकार करने के लिए कुख्यात एक तेंदुआ गन्ने के खेत में मृत पाया गया। विघटन के कारण मौत का कारण अज्ञात है, जिससे पोस्टमार्टम परीक्षा नहीं हो सकी। अधिकारियों को वृद्धावस्था या हीटस्ट्रोक का संदेह है, लेकिन निश्चित कारण अस्पष्ट हैं। सभी अंग सुरक्षित पाए गए।