शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई रोटरी क्लबचे पदग्रहण थाटात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

अंबाजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल ...

अंबाजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, कविता मोतीपवळे, उपप्रांतपाल दादासाहेब जमाले पाटील, साधना जमाले पाटील, प्रसाद चिक्षे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर मावळते पदाधिकारी डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, नूतन पदाधिकारी विवेक गंगणे, प्रा. रोहिणी पाठक यांची उपस्थिती होती. पदग्रहण समारंभात रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी नूतन अध्यक्ष विवेक गंगणे यांच्याकडे तर मावळते सचिव कल्याण काळे यांनी नूतन सचिव प्रा. रोहिणी पाठक यांच्याकडे पदभार सोपविला. याप्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे यांना रोटरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह व सन्मानपत्र असे होते. यावेळी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे, दादासाहेब जमाले पाटील, विवेक गंगणे, प्रसाद चिक्षे, प्रा. रमेश सोनवळकर, अमृत महाजन, रोहिणी पाठक, डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन कराड यांनी केले. प्रा. रोहिणी पाठक यांनी आभार मानले. यावेळी प्रा. दामोधर थोरात, जगदीश जाजू, शेख मोईन, भागवत कांबळे, सुहास काटे, बाबूराव बाभूळगावकर, संतोष मोहिते, ॲड. अनंत जगतकर, आनंद कर्नावट, विश्वनाथ लहाने, नंदकिशोर मुंदडा, अनिकेत लोहिया, डॉ. राजेश इंगोले, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, धनराज सोळंकी, डॉ. कल्पना मुळावकर, गोरख मुंडे, मनोज लखेरा, गणेश राऊत, ललित बजाज, आनंद जाजू, रूपेश रामावत, स्वप्निल परदेशी, भीमाशंकर शिंदे, अनिरुद्ध चौसाळकर, सचिन बेंबडे, गोपाळ पारीख, बाळासाहेब कदम, राम सारडा, राधेशाम लोहिया, प्रदीप झरकर, अभिजित जोंधळे, आनंद टाकळकर, राजू रांदड, मंदाकिनी गित्ते, स्वरूपा कुलकर्णी, संजय देशपांडे, हर्षवर्धन वडमारे, ॲड. संतोष पवार, संजय बोरा, प्रशांत आदनाक, सुवर्णा गंगणे, अंजली चरखा, मेघना मोहिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

160721\51310856img-20210716-wa0117.jpg

ज्ञानप्रबोधिनी चे समन्वयक प्रसाद चिक्षे यांना रोटरी भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.