शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीचा वाद, पोलीस अधीक्षक कार्यालयातच पतीने घेतले विष - फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST

बीड : पती-पत्नी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात ४ जानेवारी रोजी बोलावले होते. ...

बीड : पती-पत्नी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात ४ जानेवारी रोजी बोलावले होते. समुपदेशन सुरू होते. याचवेळी पतीने कक्षाच्या बाहेर येत विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इम्तीयाज कुरेशी (वय ३० रा.गेवराई) असे विष घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इम्तीयाज यांचा साधारणत १० वर्षांपूर्वी गेवराई शहरातीलच मुलीशी विवाह झाला. सुरुवातीचे काही दिवस आनंदाने गेले. त्यांना दोन अपत्येही आहेत. परंतु, मागील वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडू लागले. त्याची पत्नी माहेरी गेली. त्यानंतर तिने महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज दिला. दोन वेळा समुपदेशन करून सोमवारी तिसरी तारीख होती. दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. येथील महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याला तात्काळ जुन्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पाठविले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

कक्षात नेमके झाले काय?

इम्तीयाजसोबत संसार करण्यास तयार आहे, परंतु तो नकार देत आहे. सोमवारी तिसरी तारीख असल्याने आम्ही आलो होतो. अचानक बोलणे चालू असतानाच त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे इम्तीयाजची पत्नी माध्यमांना सांगत होती. जिल्हा रुग्णालयात ती आपल्या चिमुकल्यासह पतीला आधार देण्यासाठी आली होती.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ

सध्या जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अचानक हा रुग्ण ओपीडी क्लिनीकमध्ये आल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. परंतु, त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. डॉ.स्वप्निल बडजाते, डॉ.कमलाक्षी काकडे, परिचारिका शमा गुजर, विक्रांत पाखरे, कॉलमन गणेश पवार, गोरक्षनाथ घोलप, रोहित घनघाव, बाळकृष्ण पवार यांनी त्याला उपचार करून स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याची ॲॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनीही तात्काळ उपचार करण्याच्या सूचना केल्या होत्या.