शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बहीण-भाऊजीच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह गोदावरीत फेकला, मुलाकडून शंकेने वाचा फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:07 IST

"तीन दिवस उसाच्या शेतात होता मृतदेह!" वास सुटल्याने गोणीत भरून शहागडच्या पुलावरून गोदावरीत फेकला; तिघे आरोपी गजाआड.

गेवराई (जि. बीड) : त्रास देत असलेल्या पतीचा बहिणीच्या गावी बहीण व भाऊजीच्या मदतीने गळा दाबून खून केला. तीन दिवसांनंतर मृतदेह शहागडच्या गोदावरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पती हरविल्याची तक्रार पुण्याच्या सिंहगड पोलिस ठाण्यात देऊन बनाव केला. शेवटी चौकशीसाठी पुणे पोलिस गेवराईत आले. मुलाने आपल्या वडिलांचा घातपात झाला असावा, अशी शंका व्यक्त केल्यानंतर खुनाला वाचा फुटली. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे आठ महिन्यांआधी घडलेली खुनाची घटना समोर आली आहे. पोलिसांनी संशयित पत्नी, तिची बहीण व भाऊजी यांना बेड्या ठोकल्या आहेत.

गेवराईच्या संजयनगरातील उद्धव तुकाराम शिंदे (वय ५०) हे पुण्यात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. पत्नी संगीता शिंदे (वय ४६) यांच्याशी त्यांचे नेहमी वाद होत होते. यातून उद्धव नेहमी संगीताला मारहाण करत असे. ६ सप्टेंबर २०२५ रोजी दोघे पुण्याहून दुचाकीने गेवराई तालुक्यातील पांढरवाडीत संगीताची बहीण सविता वाजे (४८) व साडू विष्णू वाजे (वय ५५) यांना भेटण्यासाठी आले. पती नेहमीच मारहाण करत असल्याचे संगीताने दोघांना सांगितले. दररोजच्या मारहाणीला कंटाळून तिघांनी उद्धवच्या खुनाचा कट रचला. एका रात्री बहीण व भाऊजीच्या मदतीने संगीताने पतीचा गळा आवळून खून केला. विष्णूने त्याच्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह पांढरवाडीतील उसाच्या शेतात टाकून दिला. परंतु तीन दिवसांनी वास सुटल्याने मृतदेह गोणीत भरून दुचाकीवरून शहागड येथे जाऊन जुन्या पुलावरून गोदावरी नदीत टाकून दिला. त्यानंतर दोन दिवसांनी दुचाकीही गोदावरीत टाकून दिली.

पती मिसिंगची तक्रार देऊन बनावसंगीताने पुण्याच्या सिंहगड पोलिसांत पती हरविल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून २ मे २०२६ रोजी पुणे आयुक्तालयातील एक पोलिस अंमलदार व उद्धवचा मुलगा शुभम असे दोघे गेवराई ठाण्यात आले. माझ्या वडिलांचे काही बरेवाईट झाले आहे, अशी शंका शुभमने गेवराई पोलिसांसमोर व्यक्त केली. पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. 

तिघे अटकेत, गोदावरीत दुचाकीचा सांगाडा सापडलापोलिसांनी पांढरवाडीत जाऊन विष्णू, सविता, उद्धवची पत्नी संगीता अशा तिघांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी खुनाचा गुन्हा कबूल केला. शुभम याच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोदावरी नदीत फेकलेल्या मोटारसायकलचा सांगाडा पोलिसांना मिळून आला आहे.

आठ महिन्यांत गुन्हा उघडकीसआठ महिन्यांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात सपोनि. संतोष जंजाळ, सपोनि. अण्णासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, पोलिस उपनिरीक्षक संजय उदगीरकर, सुरेश पारधी, इसाक शेख, राजू भिसे, कल्याण राठोड, राजेंद्र राऊत, चंद्रसेन माळी, सुंदर राठोड, गोरक्ष डोके, धीरज खांडेकर, जितेंद्र ओव्हाळ, दिनेश ढाकणे, महादेव कदम, रेखा तुपे, रेशमा पौळे यांना यश आले. याप्रकरणी अधिक तपास सपोनि. दीपक लंके करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Kills Husband with Kin's Help, Body Dumped in River

Web Summary : A woman, with her sister and brother-in-law's assistance, murdered her husband due to constant abuse. They dumped the body in a river, staged a missing person report, but suspicion arose from their son, leading to their arrest.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या