शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कन्या जन्मदर वाढीसाठी बीड पॅटर्न ठरणार ‘गाईड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:51 IST

मागील दहा वर्षांत मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ८१० वरून ९६१ वर पोहचला आहे. बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील दहा वर्षांत मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ८१० वरून ९६१ वर पोहचला आहे. बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. आता हाच ‘बीड पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला जाणार आहे. यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शास्त्रीय अभ्यास करून मार्गदर्शक सुची करण्याचे निर्देश दिले आहेत.२०११ साली बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा एक हजार मुलांमागे ८१० एवढा होता. त्यानंतर २०१२ साली आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची चौकशी तसेच नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत डॉक्टरांसह नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. तर अनेक सोनोग्रामफी सेंटरच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कायद्याचा धाक बसला आणि अवैध गर्भपात बंद झाले. याचा परिणाम जिल्ह्यात मुलींच्या जन्मदर वाढण्यास झाला. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजना, मातृवंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना या योजना सर्वच यंत्रणांनी प्रभावीपणे राबविल्या. बीड राज्यात अव्वलही राहिले. त्याचबरोबर गर्भवती महिलांची तपासणी आणि मुलींबद्दल सामाजिक पातळीवर केलेली जनजागृती याचाही फायदा मोठ्या प्रमाणात झाला आहे. लोक शिक्षण, जनजागृती आणि केलेल्या कठोर कारवायांमुळे मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांची यादी करुन इतर जिल्ह्यांना पाठविली जाणार आहे.जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार, महिला व बालकल्याण अधिकारी चंद्रशेखर केकाण यांच्या टिमसह सामाजिक संघटना यासाठी जनजागृती करून परिश्रम घेत आहेत.जिल्हा रूग्णालयात तीन हजार मातांचा परिचारिकांकडून सन्मानमुलींना जन्म देणा-या मातांचा जिल्हा रूग्णालयात सन्मान केला जातो. आतापर्यंत जवळपास ३ हजार मातांचा सन्मान करण्यात आलेला आहे.यासाठी प्रसुती विभागातील डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी नेहमीच सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.पहिल्यांदा बीडमधून अशा वेगळ्या आणि कौतुकास्पद उपक्रमाला सुरूवात झाली आहे.

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्यGovernmentसरकारSocialसामाजिक