शिवसेनेतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST2021-04-15T04:31:40+5:302021-04-15T04:31:40+5:30

राजस्थानी विद्यालयात जयंती उत्साहात बीड : येथील राजस्थानी सेवा समाज संचलित द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Greetings from Shiv Sena | शिवसेनेतर्फे अभिवादन

शिवसेनेतर्फे अभिवादन

राजस्थानी विद्यालयात जयंती उत्साहात

बीड : येथील राजस्थानी सेवा समाज संचलित द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक डी. के. अंकुशे, पर्यवेक्षक आर. बी. सारडा, ज्येष्ठ शिक्षक एम. बी. कलाणे, लिपिक आर. के. झंवर, ग्रंथपाल एन. के. सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एस. तोतला यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार शिवशंकर मुंडे, जे. व्ही. घाडगे, संध्या मोराळे, छाया जिरे व इतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

===Photopath===

140421\14bed_13_14042021_14.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी कार्यालय

Web Title: Greetings from Shiv Sena