नगरपालिकेविरुद्ध गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST2021-03-25T04:31:00+5:302021-03-25T04:31:00+5:30

बीड : शहरातील विविध प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत न.प.ने उभारलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण केला. शहरातील नागरिकांना ...

Gandhigiri against the municipality | नगरपालिकेविरुद्ध गांधीगिरी

नगरपालिकेविरुद्ध गांधीगिरी

बीड : शहरातील विविध प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत न.प.ने उभारलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण केला. शहरातील नागरिकांना तसेच शासकीय कार्यालयासमोर शुद्ध पिण्याचे पाणी तसेच शौचालय असुविधा, नगर रोडवरील शासकीय कार्यालयांसमोर महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नाहीत. पुरुषांसाठी बांधलेल्या स्वच्छता गृहातील अस्वच्छता तसेच परिसरातील घाणीची नियमित साफसफाई करण्यात येत नाही. विद्युतपुरवठा खंडित केल्यामुळे शहर अंधारात आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वेळोवेळी आंदोलन करून निवेदने देऊन देखील याची दखल घेतली जात नसल्यामुळे सोमवारी माने कॉम्प्लेक्स परिसरातील तीन माकडांच्या प्रतिकृतीला पुष्पहार घालून डाॅ. गणेश ढवळे, शेख युनुस, अजय सरोदे यांनी नगरपालिकेचा निषेध केला.

===Photopath===

220321\16511351222_bed_22_22032021_14.jpg

===Caption===

गांधीजींच्या माकडांना पुष्पहार घालताना सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: Gandhigiri against the municipality