शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकर डाळिंबबागेवर शेतकऱ्याने फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

लोकमत न्युज नेटवर्क धारूर : सहा वर्षांपूर्वी लावलेली दोन एकर डाळिंबबाग जिवापाड जपली. परंतु दरवर्षी कोळी व तेल्या ...

लोकमत न्युज नेटवर्क

धारूर : सहा वर्षांपूर्वी लावलेली दोन एकर डाळिंबबाग जिवापाड जपली. परंतु दरवर्षी कोळी व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत होता. याबरोबरच यंदा बऱ्यापैकी फळे येऊन कोरोनामुळे डाळिंबाला भाव नव्हता. यामुळे डाळिंबबाग तोट्यातच होती. यास कंटाळून एका शेतकऱ्याने दोन एकर डाळिंबबागेवर ट्रॅक्टर फिरवला.

तालुक्यातील चोरांबा येथील डाळिंब उत्पादक शेतकरी बाळासाहेब चव्हाण यांनी सहा वर्षांपूर्वी डाळिंबबाग लावली होती. ही बाग त्यांनी जोपासली. मोठी केली. त्यास फळेदेखील येऊ लागली; परंतु फळधारणा होताच ते रोगाला बळी पडू लागले. दरवर्षीच कोळी आणि तेल्या रोगाचा बागेवर प्रादुर्भाव होऊ लागला. पर्यायाने उत्पादनावर परिणाम झाला. बाग तोट्यात आली. यंदाही बऱ्यापैकी फळे आली. परंतु कोरोनामुळे त्याला भाव मिळाला नाही. अशा दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले. पर्यायाने दरवर्षी तोटाच सहन करावा लागला. यामुळे चव्हाण यांनी मंगळवार, बुधवारी या बागांवर चक्क नांगर फिरविला. ट्रॅक्टरच्या साह्याने त्यांनी सहा वर्षे जिवापाड जपलेली दोन एकर डाळिंबबाग उपटून टाकली. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांत डाळिंबाला विमा भरपाईदेखील मिळाली नाही. तरी या शेतकऱ्याला पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

===Photopath===

230621\img-20210623-wa0112.jpg

===Caption===

दोन एकर डाळिंब बागेवर नांगर फिरवताना शेतकरी.