शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

'राखेचे प्रदूषण हटाव, ग्रामस्थ बचाव'; प्रदूषणाने त्रस्त दादाहरी वडगावचे ग्रामस्थ करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:45 IST

परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात  थर्मल चे राख  तळे असून या राख तळ्यातून दररोज 4000 टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जाते.

परळी : औष्णिक विद्युत केंद्र थर्मलचे दादाहरी वडगाव व दाऊतपूर येथील शिवारात राखसाठा करण्यात येतो. मात्र यामुळे प्रचंड प्रदूषण होत असून याचा येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. याप्रश्नी 'प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव' अशी घोषणा देत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. 

परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात  थर्मल चे राख  तळे असून या राख तळ्यातून दररोज 4000 टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जाते. वाहतुकी दरम्यान खाली पडणाऱ्या राखेमुळे परळी- गंगाखेड रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. राखेच्या प्रदूषणामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, दादा हारी वडगाव येथील साडेतीन हजार  ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा  गेल्या अनेक वर्षापासून  त्रास  होत आहे. त्यांना डोळ्यांचे व फुफूसाचे आजार जडले आहेत. त्यांनी सातत्याने प्रदूषण थांबविण्याची मागणी करूनही परळी विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याकडून कसलीही  ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे त्रस्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असून 12 फेब्रुवारी रोजी परळी -गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगाव जवळ रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ते निवेदन ग्रामस्थांनी तहसील प्रशासनास दिले आहे. यावर राखेच्या प्रदूषणासंदर्भात परळी विद्युत केंद्र व ग्रामीण पोलिसांना  सूचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने कारवाई सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी दिली आहे. 

आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थांमध्ये असंतोष असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दादाराव वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी दिली. राख प्रदूषण नियंत्रण समितीने जी चळवळ सुरू केली .त्या चळवळीतमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.मनोज मुंडे यांनी केले आहे. 

राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. राखसाठे उद्ध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील. - शिवलाल पूरभे, पोलीस निरीक्षक, परळी ग्रामीण  

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन