शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार ...

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार असून, उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. रब्बी हंगामातील ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावर्षी चांगला पाऊस खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. मात्र, आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. यामध्ये हरभरा, गहू व ज्वारी या पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव तसेच घाटे अळ‌ी तसेच रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट देखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात जेणेकरून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल तसेच विविध प्रकारची फवारणी करून ‌उपाययोजना केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.

सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू

रब्बी हंगामात यावर्षी ज्वारी १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टरवर पेरा आहे. तर, त्याखालोखाल हरभरा १ लाख ३८ हजार ६७ हेक्टर तर, ३३ हजार हेक्टरवर गहू या पिकाचा पेरा करण्यात आला आहे. इतर क्षेत्रावर मका व भाजीपाला आहे.

या कराव्यात उपाययोजना

हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर, प्रत्येक रोपावर २ ते ३ आळ्या आढळल्यास नियंत्रण करणे गरजेचे आहे. यामध्ये ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एन.पी.व्ही.२५० मिली प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच क्लोरोपायरिफॉस २० ईसी, क्विनॉफॉस २५ ईसी, इमामेक्टीन बेंजोएट ५ एसी यापैकी एका औषधाची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने करावी. मावा किडीच्या किंवा चिकटा नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ईसी १.५ मिलि. प्रति लिटरपाणी याप्रमाणे फवारणी करावी अशी माहिती आष्टीचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.सुपेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी फवारणीचा सल्ला घेण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, त्यांना देखील शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणी माहिती देण्यास टाळाटाळ केली तर त्यांची तक्रार कृषी अधीक्षक कार्यालयात करावी.

-सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी) बीड