शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १,४३१ जणांचे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरुर कासार : तालुक्यातील शिरुर, खालापुरी, रायमोहा आरोग्य केंद्रामार्फत शनिवारी एकाच दिवशी विक्रमी १,४३१ जणांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरुर कासार : तालुक्यातील शिरुर, खालापुरी, रायमोहा आरोग्य केंद्रामार्फत शनिवारी एकाच दिवशी विक्रमी १,४३१ जणांना कोरोना लसीकरण केले. तालुक्यात आतापर्यंत २२ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या आदेशानुसार, उपकेंद्र असलेल्या ठिकाणी जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.किशोर खाडे, डॉ.सुहास खाडे, डॉ.संजीवनी गव्हाणे हे नियोजन करीत आहेत. दिलेल्या सर्व १०० टक्के लसींचे लसीकरण करण्यात येत आहे.

शिरुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जाटनांदूर, टेंभुर्णी, पिंपळनेर, सावरगाव, राक्षसभुवन येथे एकाच दिवसात विक्रमी ९८८ लाभार्थ्याचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ९८५ जणांनी पहिला डोस, तर ३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र खालापुरी व रायमोह येथे एकूण ४४३ लाभार्थ्याना लस देण्यात आली. आतापर्यंत शिरुर तालुक्यात २२ हजार ४६ लोकांना कोविड लस देण्यात आली आहे. त्यामध्ये १७,९१३ लोकांनी पहिला, तर ४,१३३ लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे, असेही डॉ.गवळी यांनी सांगितले.

...

१०० टक्के लसीकरण करणार

कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे जास्तीतजास्त प्रमाणात गावापर्यंत १०० टक्के लसीकरण करण्यासाठी नियोजन केले आहे. गाफील न राहता, लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी ङॉ.अशोक गवळी यांनी केले आहे. सध्या शिरुर शहरात, तसेच ग्रामीण भागात लोक गर्दी करत असून, मास्क तसेच सॅनिटायझरचा लोकांना विसर पडला आहे, लोकांनी कोरोनाला गांभीर्याने घेऊन कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

040721\img-20210704-wa0019.jpg

शिरुर तालुक्यात आरोग्य विभागातर्फे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे.