महिला कॅरम खेळाडूंसाठी बीडमध्ये स्पर्धा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST2021-08-27T04:35:55+5:302021-08-27T04:35:55+5:30

बीड : कॅरम खेळात बीड शहरच नाही, तर जिल्हा पातळीवरसुद्धा फक्त पुरुष खेळाडूंच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या. परंतु, यावेळी ...

Competition in Beed for Women Carrom Players - A | महिला कॅरम खेळाडूंसाठी बीडमध्ये स्पर्धा - A

महिला कॅरम खेळाडूंसाठी बीडमध्ये स्पर्धा - A

बीड : कॅरम खेळात बीड शहरच नाही, तर जिल्हा पातळीवरसुद्धा फक्त पुरुष खेळाडूंच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या. परंतु, यावेळी प्रथमच महिला कॅरम खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, यासाठी बीड शहर पातळीवर स्पर्धेचे आयोजन केल्याने महिला कॅरम खेळाडूंना आपल्यातील खेळ व्यासपीठावर दाखविण्याची संधी प्रथमच मिळणार आहे.

शहरातील धानोरा रोडवरील वरद प्राइड कॉम्प्लेक्स येथे येत्या २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान महिला कॅरम खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा निकाल ३१ ऑगस्ट रोजी जाहीर होऊन बक्षीस वितरण होईल. विजेत्यांना सहा प्रकारची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे स्वरूप सिंगल व डबल अशा दोन्ही प्रकारांत असून इच्छुक महिला खेळाडूंनी युग साक्षी कॅरम प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा किंवा जिल्हाध्यक्ष आम्रपाली गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Competition in Beed for Women Carrom Players - A