घरात घुसून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:58+5:302021-07-18T04:23:58+5:30

बीड : तुझा मुलगा माझ्या सुनेला फोनवर का बोलतो, असे विचारत घरात घुसून युवकाला गंभीर मारहाण करीत जखमी ...

Breaking into a house and beating one | घरात घुसून एकास मारहाण

घरात घुसून एकास मारहाण

बीड : तुझा मुलगा माझ्या सुनेला फोनवर का बोलतो, असे विचारत घरात घुसून युवकाला गंभीर मारहाण करीत जखमी केल्याची घटना माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदवाडी येथे घडली असून, जखमी वडिलाच्या फिर्यादीवरून तिघाजणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेभाऊ रामभाऊ हंडागळे (वय ४३, रा. गोविंदवाडी) याने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सर्जेराव रामभाऊ खंडागळे, दत्त सर्जेराव खंडागळे, वृंदावन सर्जेराव खंडागळे (सर्व, रा. गोविंदवाडी) यांनी आमच्या सुनेला तुझा मुलगा फोनवर का बोलतो, असे म्हणत काठ्या, कुऱ्हाडीने गंभीर मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात कलम ३२६, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हे ढोबडे हे करीत आहेत.

Web Title: Breaking into a house and beating one