विवाहित महिलेचे प्रेत विहिरीत सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:29+5:302021-07-24T04:20:29+5:30

धारूर : धारूर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरात एका २४ वर्षे महिलेचे प्रेत विहिरीत सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली ...

The body of a married woman was found in a well | विवाहित महिलेचे प्रेत विहिरीत सापडले

विवाहित महिलेचे प्रेत विहिरीत सापडले

धारूर : धारूर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरात एका २४ वर्षे महिलेचे प्रेत विहिरीत सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली असून या महिलेचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

शिवकन्या ज्ञानेश्वर आडे (वय २४) असे मृत महिलेचे नाव असून ती व तिचा पती ज्ञानेश्वर आडे गुरुवारी दोघेच शेतामध्ये गेले होते. दरम्यान, अचानक बायको गायब झाल्यामुळे सैनिक पतीने सर्वत्र शोध घेतला. संशयावरून विहिरीत पत्नी शिवकन्याने उडी मारली की काय या कारणाने विहिरीत असलेले पाणी तीन मोटर लावून पाणी उपसा करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी सदर मृत महिलेचे प्रेत विहिरीत सापडले. दरम्यान दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत महिलेवर धारूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा संशय असल्याचा आरोप केला आहे. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदनानंतर सिद्ध होणार असल्याची माहिती दिंद्रुड पोलीस स्टेशनचे फौजदार विठ्ठल शिंदे यांनी दिली. अधिक तपास दिंद्रुड पोलिस करत आहेत.

230721\img-20210723-wa0115.jpg

शिवकन्या आडे विवाहीता

Web Title: The body of a married woman was found in a well