शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई, सिरसाळा येथे लोकमतचे रविवारी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

बीड : 'लोकमत'च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या ...

बीड : 'लोकमत'च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रविवारी अंबाजोगाई, सिरसाळा (१८ जुलै) येथे, तर सोमवारी (१९ जुलै) परळीत रक्तदान शिबिर होणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत महाआरोग्य सप्ताहात लोकमतच्या संयुक्त विद्यमाने "रक्ताचे नाते" या उपक्रमात सोमवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य सेवासप्ताहमधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोयटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अंबाजोेगाईत आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार

अंबाजोगाई : लोकमत आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, भारतीय जैन संघटना व इतर संस्थांच्या सहकार्याने १८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात लोकमत व आर्ट ऑफ लिव्हिंग अंबाजोगाई, भारतीय जैन संघटना, कल्पवृक्ष अकॅडमी, आधार माणुसकीचा, मार्ड, श्रमकरी ग्रुप देवळा यांचा सहभाग राहणार आहे.

रक्तदानासाठी संपर्क -

संजय कुलकर्णी-९७६७५७७७५६, धनराज सोळंकी-९४२२२४२३२६, नीलेश मुथा-९४२२२४२०८३, कल्याण नेहरकर-९४२१४७९६४७,

ॲड. संतोष पवार-९५६११९११०६, रवींद्र देवरवाडे-९८२३८०८८६७, डॉ. केदार कुटे-८०५५८१०११०, अविनाश मुडेगावकर-९९२२४०२४६३.

या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संयोजक अविनाश मुडेगावकर यांनी केले आहे.

सिरसाळा येथेही रविवारी रक्तदान शिबिर

सिरसाळा : सिरसाळा शहरात लोकमत रक्तदान मोहिमेत सहभागी असलेले शिवसेना, धनगर समाज विकास, एमआयएम, टिपू सुलतान युवा मंच सिरसाळा, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, नारीशक्ती महिला गट, टायगर ग्रुप, बहुजन वंचित आघाडी, शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान सिरसाळा, शिवसेवक समिती महाराष्ट्र, राज्यसंघर्ष वाहन चालक-मालक संघटना, मानवी हक्क अभियान सिरसाळा, ग्रामपंचायत कर्मचारी सिरसाळा, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था सिरसाळा, पोहनेर येथील युवा वर्ग आधी सामाजिक संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभणार आहे. १८ जुलै रोजी सिरसाळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र (सरकारी दवाखाना) येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवून एक सामाजिक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

रक्तदानासाठी सिरसाळ्याचे लोकमत वार्ताहर डॉक्टर जे. एन. शेख यांच्या ९१३०१०६७६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. सिरसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष जावेदखाॅं पठाण, उपाध्यक्ष रमेश लहाने, सचिव अनिल देशमुख व सर्व सदस्य पत्रकार संघ सिरसाळा, मराठी पत्रकार परिषद परळी तालुका उपाध्यक्ष मिलिंद राजे चोपडे, पुरोगामी पत्रकार संघ परळी तालुका ग्रामीण अध्यक्ष शेख अब्दुल्ला, माजी अध्यक्ष पत्रकार संघ सिरसाळा रफिक पठाण, पेपर एजन्सी संजय देशमुख, पेपर एजन्सी कुंडलिक लहाने व सिरसाळा परिसरातील पत्रकारांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे दात्यांना आवाहन केले आहे.