शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये खळबळ! आष्टीत मंदिरामागे आढळला हॉटेल कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:36 IST

नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू 

- नितीन कांबळे

कडा (बीड): आष्टी येथील बाबाजी कुस्ती संकुलासमोरील शिवमंदिराच्या पाठीमागे शनिवारी सायंकाळी एका ४७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. गजानन लोडबाजी साबळे (४७) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाला हा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलीस पथकाची घटनास्थळी धावघटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, विजय नरवाडे, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. गजानन साबळे हे आष्टी तालुक्यातील एका हॉटेलवर कामगार म्हणून रुजू झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्टमृताचा देह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे की त्यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या ते कोणत्या हॉटेलवर कामाला होते आणि शनिवारी सायंकाळी ते मंदिराच्या पाठीमागे कसे पोहोचले, याचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Hotel worker found dead near temple in Ashti

Web Summary : A 47-year-old hotel worker, Gajanan Sable, was found dead near a temple in Ashti, Beed. Police are investigating the cause of death, which is currently unknown. Sable's body has been sent for post-mortem.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडCrime Newsगुन्हेगारी