शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

गेम उलटा पडला! स्वस्त सोन्याच्या आमिषाने ३ लाखांना लुटले; पसार होताना चोरटे कारवर धडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 19:04 IST

फेसबुकवरील 'फ्रेंड रिक्वेस्ट' नडली! स्वस्तात सोन्याची बिस्किटे खरेदी करायला गेलेल्या सराफाला घातला गंडा; पळताना चोरांचा 'गेम' उलटला

केज (जि. बीड): स्वस्तात दुबई येथील सोन्याचे बिस्कीट खरेदी करण्याचा मोह एका सराफाला चांगलाच महाग पडला आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथील सराफ दत्ता काकडे यांना केज येथे बोलावून घेण्यात आले आणि त्यांच्याकडील ३ लाख रुपये लुटण्यात आले. मात्र, पैसे लुटून पळून जात असताना चोरांची दुचाकी एका कारला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या दोन्ही जखमी आरोपींना जेरबंद केले असून त्यांचे इतर ३ ते ४ साथीदार फरार आहेत.

असा रचला लुटीचा 'ट्रॅप'
धाराशिव जिल्ह्यातील एका भामट्याने सराफ दत्ता काकडे यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली होती. त्याने "आम्ही दुबईहून टॅक्स चुकवून सोन्याची बिस्किटे आणली आहेत, ती तुम्हाला स्वस्तात देतो," असे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून रविवारी (१७ मे) दुपारी दत्ता काकडे आणि त्यांचा कारागीर सतीश दीक्षित हे त्यांच्या 'किया' कारमधून (MH 23 BN 8387) ३ लाख रुपये घेऊन केजमधील उमरी फाट्याजवळ आले. तिथे आधीच दबा धरून बसलेले आरोपी आप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिसन शिंदे यांनी त्यांना गंगा माऊली कारखान्या जवळील एका शाळेच्या भिंतीच्या आडोशाला नेले. तिथे जाताच चोरांनी कारागीर सतीश दीक्षित यांच्या हातातील ३ लाख रुपयांची पिशवी हिसकावून घेतली आणि सराफाच्या पाठीत लोखंडी रॉडने मारहाण करून दुचाकीवरून पळ काढला.

पळताना अपघात, पोलिसांकडून धरपकड
चोरटे पैशांची पिशवी घेऊन भरधाव वेगाने केजकडे पळून जात होते. गोळा झालेल्या जमावाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, नियंत्रण सुटून चोरांची दुचाकी समोरून येणाऱ्या एका कारवर (MH 05 AJ 8312) जोरात आदळली. या भीषण अपघातात आप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिसन शिंदे (दोघे रा. मांडवा, ता. कळंब, जि. धाराशिव) हे गंभीर जखमी झाले.

गुन्हा दाखल करण्यात आला
घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप मांजरमे आणि पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चाकू आणि केबल वायरचा बंच मिळून आला. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सराफ दत्ता काकडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold lure turns sour: Jeweler robbed, thieves crash car.

Web Summary : A jeweler in Kej was robbed of ₹3 lakhs after being lured with cheap gold. The thieves crashed their getaway bike, injuring themselves. Police arrested two, while others remain at large.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी