शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

संशय आल्याने टाळले, पण एसीबीने गाठले! शेतकऱ्याला लाच मागणारा पोलिस घरातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:39 IST

पोलीसच निघाला लाचखोर! दोन महिन्यांनंतर लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचा 'करेक्ट कार्यक्रम'

बीड : शेतातून ऊसाचा ट्रॅक्टर जाऊ देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी, दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. दत्ता नागनाथ निघूळ (वय ३६, रा. पोलीस निवास, सिरसाळा) असे या लाचखोर पोलिसाचे नाव असून, मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याला त्याच्या निवासस्थानातूनच ताब्यात घेण्यात आले.

सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतकऱ्याचा ऊसाचा ट्रॅक्टर शेतातून जाऊ दिला जात नव्हता. याबाबत शेतकऱ्याने तहसीलदारांकडे दाद मागितली होती. तहसीलदारांनी या प्रकरणात मदत करण्यासाठी सिरसाळा पोलिसांना अधिकृत पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे दत्ता निघूळ याला संबंधित गावात पाठविण्यात आले होते. मात्र, ट्रॅक्टरचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी निघूळ याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. हा प्रकार २७ जानेवारी २०२६ रोजी घडला होता.

संशय आल्याने टाळले, पण एसीबीने गाठले!
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. दरम्यान, निघूळ याला तक्रारदारावर संशय आला, त्यामुळे त्याने फोन घेणे आणि भेटणे टाळले होते. मात्र, एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली होती. मंगळवारी दुपारी संधी मिळताच बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने निघूळ याला पोलीस निवासातून अटक केली. दत्ता निघूळ याच्यावर आता त्याच्याच सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठाणेदार दहिफळे अडचणीत
सिरसाळा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांचा मागील आठवड्यातच एका वकिलाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचा वकिल संघाकडून निषेध करत कारवाईची मागणी केली होती. परंतू वरिष्ठांनी त्यांना पाठिशी घातले. आता याच ठाण्यातील कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडे दोन हजार रूपयांची लाच मागितली आहे. आता दहिफळे यांचीही उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात बदली होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bribery suspicion led to avoidance, but ACB caught cop!

Web Summary : A police officer in Beed was arrested for demanding a bribe of ₹2,000 from a farmer. Dattatray Nighul was caught at his residence after an ACB investigation confirmed the bribe demand. His superior might face consequences.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस