केज (जि. बीड): तालुक्यातील औरंगपूर येथील विवेक सुधीर रानमारे (वय २७ वर्षे) या तरुणाचा दुचाकीसाठी पेट्रोल आणायला गेलेला असताना अपघात होऊन मृत्यू झाला. रविवारी (दि. ३ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास आंबा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपावरून परतत असताना टँकर आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला.
इंधन तुटवड्याची लागली झळबीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आंबा साखर कारखाना परिसरातील पंपावर पेट्रोल विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विवेक तेथे गेला होता. पेट्रोल भरून गावी परतत असताना समोरून येणाऱ्या टँकरने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवलीगंभीर जखमी झालेल्या विवेकला तात्काळ स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त टँकर ताब्यात घेतला आहे. विवेक हा माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते सुधीर रानमारे यांचा मुलगा होता. सोमवारी सायंकाळी औरंगपूर येथील शेतात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Summary : A 27-year-old man died in Beed after a tanker collided with his motorcycle while he was returning from a petrol pump due to fuel shortages. He was rushed to the hospital but succumbed to his injuries during treatment. The police have seized the tanker.
Web Summary : बीड में ईंधन की कमी के कारण पेट्रोल पंप से लौटते समय टैंकर की टक्कर से 27 वर्षीय युवक की मौत हो गई। उसे अस्पताल ले जाया गया लेकिन इलाज के दौरान उसकी मृत्यु हो गई। पुलिस ने टैंकर को जब्त कर लिया है।