शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश पाठकला वाल्मीक कराडनेच जिल्हाधिकारी म्हणून आणले; धनंजय देशमुख यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:12 IST

"कधी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले नाही, ना कधी आंदोलनकर्त्यांशी बोलले!" अविनाश पाठक यांच्या कार्यपद्धतीवर धनंजय देशमुख यांनी डागली तोफ.

बीड : ७३ कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्याने महसूल विभागात भूकंप झाला असतानाच, आता त्यांच्या नियुक्तीबाबत आणि कार्यपद्धतीबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यानेच पाठक यांना बीडचे जिल्हाधिकारी म्हणून आणले होते, असा थेट आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

अविनाश पाठक यांची २२ एप्रिल २०२५ रोजी बीडमधून बदली झाली. त्यांच्या कार्यकाळात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक बड्या नेत्यांनी मस्साजोगला भेट देऊन सांत्वन केले; मात्र जिल्ह्याचे पालक असलेल्या अविनाश पाठक यांनी कधीही पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही. विशेष म्हणजे, पाठक आठवड्यातून किमान दोन वेळा लातूरला जात असत. लातूरला जाण्यासाठी त्यांना मस्साजोगवरूनच जावे लागते आणि संतोष देशमुख यांचे घर मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही त्यांनी कधी आपली गाडी तिकडे वळवली नाही, याबद्दल धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुख्य आरोपीशी ‘साटेलोटे’?
‘जिल्हाधिकारी पाठक हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शब्दाखातरच बीडमध्ये आले होते. त्यामुळेच त्यांनी कधी मस्साजोगची पायरी चढली नाही,’ असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही जिल्हाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी असतानाही, ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलने केली, जलसमाधीचा इशारा दिला; मात्र पाठक यांनी कधीही आंदोलकांशी संवाद साधण्याची तसदी घेतली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Collector's Appointment Linked to Murder Accused, Alleges Brother

Web Summary : Brother alleges ex-Collector Avinash Pathak's appointment was influenced by murder accused Valmik Karad. Pathak neglected victim's family despite proximity, raising suspicions of collusion. Accusations include ignoring protests and prioritizing personal trips over duty.
टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण