शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सांडवा पूर्ववत झाल्यानंतर आरणवाडी तलाव ओसंडून वाहू लागला; पाच गावांमध्ये आंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 12:31 IST

रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता.

धारूर ( बीड ) : मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलाव ओसंडून वाहू लागला आहे. काही दिवसांपूर्वी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. जन रेट्यामुळे सांडवा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. यानंतर झालेल्या पावसामुळे तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. मंगळवारी रात्री सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दृष्य पाहून पाच गावच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. या प्रकारानंतर तलावाखालील आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी या गावातील ग्रामस्थांनी जन आंदोलन उभारले. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन दहाच दिवसात सांडवा पूर्ववत बांधण्यात आला. दरम्यान, मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलावात पाण्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. यामुळे मंगळवारी रात्री तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हे दृष्य पाहून पाचही गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जोरदार पावसामुळे रात्री चोरंबा-चारदरी रस्त्यावरील पुलावरून तब्बल सात फूट पाणी वाहत होते. 

पाच गावात हरीत क्रांती होणार या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत झाला. यानंतर आता तलाव पूर्ण भरल्याने डोंगरात हरीतक्रांती करण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. 

काय होते प्रकरण ?आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाले. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. माञ, रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. साठवण तलाव जुना असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तलावा खालील पाचही गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा, राज्य रस्तेविकास महामंडळ आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन उभारले होते. दरम्यान, वाढत्या जनरेट्यामुळे १० दिवसातच सांडवा पूर्ववत करण्यात आला. 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसWaterपाणी