पैशाच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:05+5:302021-07-16T04:24:05+5:30

आष्टी तालुक्यातील गौखेल येथील अमोल बबन बोखारे याला ‘गावाजवळील घोडे डोंगरात ये,’ असे फोनवर पोपट शेकडे म्हणाला. त्यावर ‘माझं ...

Abusive, threatening to kill for money | पैशाच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी

पैशाच्या कारणावरून शिवीगाळ, मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी

आष्टी तालुक्यातील गौखेल येथील अमोल बबन बोखारे याला ‘गावाजवळील घोडे डोंगरात ये,’ असे फोनवर पोपट शेकडे म्हणाला. त्यावर ‘माझं काय काम, मी येत नाही,’ असे म्हणताच गावातील ज्ञानदेव शेकडे याने फोनवर बोलणे करून मग आम्ही दुचाकीवर गेलो. तिथे जनावरे चारताना गप्पा मारत बसलो असता अचानक पोपट शेकडे याने जावयाच्या चार लाखांच्या व्यवहाराची कुरापत काढून मला ज्ञानदेव शेकडे याच्या हातातील काठी घेऊन मारहाण केली. शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी अंभोरा पोलीस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा आरोपी पोपट रामभाऊ शेकडे यांच्यावर दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे करीत आहेत.

Web Title: Abusive, threatening to kill for money