शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

क्रूर नियती! पावसापासून धान्य वाचविण्यास ताडपत्री घेऊन निघालेल्या शेतकऱ्याचा रस्त्यातच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:11 IST

कडा परिसरात हळहळ! डोंगरगण जवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला समोरासमोर धडक; शेतकरी बाबासाहेब शिंदेंचा मृत्यू.

कडा (बीड): पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतातील माल झाकून ठेवण्यासाठी कड्यावरून ताडपत्री घेऊन गावाकडे निघालेल्या एका शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री कडा-देवळाली रोडवरील डोंगरगण शिवारात घडली. बाबासाहेब जनार्धन शिंदे (५०, रा. दादेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

वाटेतच काळाचा घालामिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील बाबासाहेब शिंदे शुक्रवारी सायंकाळी आपली दुचाकी (क्रमांक MH 04, GV 5384) घेऊन कडा येथील बाजारपेठेत आले होते. किराणा आणि शेतीमाल पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री खरेदी करून ते गावी परतत होते. डोंगरगण जवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

परिवारावर दुःखाचा डोंगरधडक इतकी भीषण होती की बाबासाहेब शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शिंदे यांच्या निधनाने दादेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Farmer Dies in Accident While Protecting Crops from Rain

Web Summary : A farmer died in an accident near Kada while returning home with tarpaulin to protect his crops from rain. Babaसाहेब Shinde, 50, was struck by an unidentified vehicle. He leaves behind his wife and two children.
टॅग्स :FarmerशेतकरीAccidentअपघातBeedबीड