शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

​केसांची समस्या भेडसावतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:15 IST

महिलांचे सौंदर्य खुलविण्यात केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे सर्वच महिलांना आपले केस लांबसडक, काळे, घनदाट असावेत असे वाटते. विशेष म्हणजे असे केस स्त्रियांसोबत पुरुषांनादेखील आकर्षित करतात.

-Ravindra Moreमहिलांचे सौंदर्य खुलविण्यात केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे सर्वच महिलांना आपले केस लांबसडक, काळे, घनदाट असावेत असे वाटते. विशेष म्हणजे असे केस स्त्रियांसोबत पुरुषांनादेखील आकर्षित करतात. वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल यामुळे आजकाल केस गळणे, पिकणे, दुभंगणे, कोंडा होणे अशा अनेक समस्या महिलांना भेडसावतात. या समस्या सोडविण्यासाठी महिला अनेक महागड्या ट्रिटमेंट्स करतात. मात्र अपेक्षित फायदा होत नसल्याने नाराजही होतात. आजच्या सदरात आम्ही तुम्हांला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे घरबसल्या तुम्ही केसांच्या समस्या सोडवू शकता.* आवळा-केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि आवळयांमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते. यासाठी आवळ्याचा उपयोग आपल्या आहारात करावा. आवळ्याचे लोणचे, रस किंवा आवळ्याचा मुखवास हे घरात असावेतच. आवळ्याचा विविध व्यंजनांचा समावेश आपल्या आहारात करावा. तसेच आवळा खोबरेल तेलामध्ये काही दिवस ठेऊन ते तेल लावणेही केसांना फायदेशीर ठरते. * कांदा-बºयाच जणांना केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्या असतात. त्यामुळे केसांचे आरोग्य ढासळते. यासाठी कांदा हा उपयुक्त असून, कांद्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये नेहमीच करावा. तसेच २ ते ३ कांद्यांचा रस काढून तो रस केसांच्या मुळाशी लावावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी सौम्य शांपूने केस धुवावेत. यामुळे केसातील कोंडा कमी होऊन केसांची वाढ योग्य प्रकारे होते.  * तिळाचे तेल-केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने केस अकाली पांढरे होतात. त्यामुळे साहजिकच आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होतो. पांढºया केसांना तिळाचे तेल लावल्यास नक्कीच फायदा होतो. नारळाच्या तेलासारखेच तिळाचे तेलही केसांना गुणकारी आहे. * कडुलिंबाची पाने-केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे कडुलिंबाची पाने होय. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ती केसांच्या मुळांना लावावी. त्यानंतर सौम्य शांपूने केस धुऊन टाकावेत, कोंडा निघून जातो. शिवाय केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. * चहाची पाने-आपल्या रोजच्या वापरातील चहादेखील केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चहाच्या पानांचा पेस्ट करुन ती पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळवावीत आणि ते पाणी केसांना लावावे. यामुळे केस काळे राखण्यास मदत होते.* संत्री-केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी फारच उपयुक्त असल्याने संत्र्याचा रस केसांना लाऊन तो रस काही वेळ ठेवावा आणि केस धुवावेत यामुळे केस मुळापासून मजबूत आणि मऊ होतात.  यापद्धतीने आपण आपल्या केसांची काळजी घरच्या घरी घेऊन केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकू .