शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

​प्रशांत दामले यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 12:40 IST

कार्यबाहुल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगुन मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी...

कार्यबाहुल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगुन मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आपला विहित कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच शुक्रवारी दादरच्या शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या निर्मात्यांच्या विशेष सभेत राजीनामा दिला. त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनीदेखील राजीनामा दिला आहे. प्रशांत दामले यांनी निर्मात्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतल्याने संघाचे अनेक सदस्य त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यातच गेली दोन वर्षे राज्य शासनाच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेसंदर्भातजे घोळ घातले गेले त्यात निर्माता संघांचे पदाधिकारी असलेल्या दिलीप जाधव यांनी घेतलेली संशयास्पद भूमिकाही प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे आरोप अनेक निर्मात्यांकडून त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यांच्या या कारवायांच्या बाबतीतही अध्यक्ष या नात्याने प्रशांत दामले यांनी ठोस भूमिका न घेता त्यांना पाठीशी घातल्याचा निर्मात्यांचा आरोप होता.शासनाबरोबरच्या नाट्य स्पर्धेसंबंधीच्या लढ्यात निर्माता संघाचे अध्यक्ष म्हणून दामले यांनी काहीएक भूमिका घेणे आवश्यक असताना त्यांनी ती न घेतल्याने अनेक निर्माते संतप्त झाले होते. याखेरीज नाट्य व्यवसायाशी संबंधित अनेक प्रश्नांवरही अध्यक्ष दामले यांनी जे निर्णय घेणे अपेक्षित होते ते न घेतल्याने त्यांच्या कारभारावर निर्माते रुष्ट होते. या सगळ्या घटनांची परिणती प्रशांत दामले यांच्यासह निर्माता संघाच्या सबंध कार्यकारिणीने राजीनामा देण्यात झाल्याचे समजते. आता नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून १८ जुलैपर्यंत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पाठवावेत असे आवाहन निर्माता संघातर्फे करण्यात आले आहे.